शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे स्नेहसंमेलन उत्साहात
कुडाळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे,मेंदूच्या व्यायामासाठी अवांतर वाचनावर भर द्या मोबाइलचा हे दुधारी शस्त्र आहे त्याचा अतिवापर टाळून आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठीच त्याचा वापर करा असा सल्ला साहित्यिक स्नेहल फणसळकर यांनी दिला. शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानी संस्था अध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर, सचिव मुकुंद धुरी, जिल्हा समग्र शिक्षणच्या समन्वयक स्मिता नलावडे, झारपचे प्रथितयश उद्योजक दिलीप प्रभु तेंडोलकर,संचालक बबन बोभाटे,मोहन सावंत, प्रताप कुडाळकर, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष उमेश प्रभुतेंडोलकर, साळगाव पोलीस पाटील तुषार जाधव, झाराप माजी सरपंच प्रभाकर मेस्त्री, मुख्याध्यापक सलीम तकीलदार, स्नेहा खानोलकर, वासुदेव मेस्त्री, श्रीकृष्ण परब,छायाचित्रकार नितीन कुडाळकर, पालक, माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. स्नेहल फणसळकर म्हणाल्या,आपण सजग विद्यार्थी बनलं पाहिजे आज तुम्हाला अनेक प्रलोभने विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात, तुम्ही स्वतःला स्वयंम शिस्त लावून घ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कठीण काळ येतो अशावेळी तो काळ म्हणजे आपल्या संयमाच्या परीक्षेचा काळ आहे असे समजून काम करा. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समग्र शिक्षण च्या समन्वयक स्मिता नलावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या बालपणीचे अनुभव हे आपल्याला भविष्याची दिशा दाखवतात विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करून प्रयत्न व जिद्दीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळावा जीवनात कितीही संकटे आली तरी ध्येय पासून विचलित होऊ नका असे सांगितले. यावेळी संस्था अध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात नवनवीन होत असलेल्या बद्दलबद्दल माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा वेळेचा सदुपयोग करावा व आपल्या आई-वडिलांच्या नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात धवल यश संपादित केलेल्या प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. चालू वर्षीचा क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून तुकाराम हळदणकर व सानिका बगळे यांची तर आदर्श विद्यार्थी-विद्यार्थीनी म्हणून अनुक्रमे इयत्ता दहावी बारावीसाठी गीतेश मेस्त्री, मयुरी वाडकर, साहिल कोलार, सानिका डिचोलकर यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी तर सूत्र संचलन सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर व सहाय्यक शिक्षिका सुप्रिया पेडणेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक एकनाथ कांबळे यांनी केलं.












