कर्नाटकी घुसखोर मलपी बोटधारकांचे धाबे दणाणले: महिन्याभरातील सलग चौथी कारवाई
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करणाऱ्या मलपी बोटींच्या विरोधात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर आज पुन्हा महाराष्ट्र सागरी जलधीक्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी बोटीवर कारवाई झाली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणारी कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका ‘संनिधी 1’ ही सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने पकडली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती समोरील समुद्रात ही कारवाई करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी नौका मालवण सर्जेकोट बंदरात आणण्यात आली आहे. संनिधी 1 क्रमांक IND-KA-02-MM-4594 महाराष्ट्र राज्याच्या जलाधी क्षेत्रात सिंधुदुर्ग निवती समोर 10 सागरी नॉटीकल मैल क्षेत्रात अवैध्य मासेमारी करताना पकडली. पुढील कार्यवाहीसाठी नौका मालवण सर्जेकोट बंदरजेटी येथे आणण्यात आली आहे.
नौकेची तपासणी, मासळीचे लिलाव व अन्य कार्यवाही सुरु होती. सदर नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई सुरू आहे. गेल्या दहा वर्षात जे झालं नाही ते महिन्याभरात करून दाखवत सलग चार घुसखोर बोटींवर कारवाई करून लोकप्रतिनिधी कसा असायला हवा याच उदाहरण आमदार निलेश राणे यांनी घालून दिलं आहे.