सिंधुदुर्ग साठी 7 सहाय्यक सरकारी अभियोक्ता नियुक्त
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : महायुती सरकार सत्तेवर येताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गृह विभागाकडील रखडलेली सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यात एकूण 491 सहाय्यक सरकारी अभियोक्ता नेमणुक करण्यात आले आहेत.यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण 7 सहाय्यक सरकारी अभियोक्ता नियुक्त करण्यात आले आहेत.याबाबत चा आदेश आज गृह विभागाचे उपसचिव श्री. दत्तात्रय कदम यांनी निर्गमित केला आहे. न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता नियुक्ती रखंडल्याने त्याचा परिणाम निवाडा निपटाऱ्यावरही होत होता. तात्पुरती आरपीपी नियुक्ती करून न्यायालयीन खटल्याचे कामकाज चालवले जात होते. आता राज्यात 491 व सिंधुदुर्गात 7 सहाय्यक सरकारी अभियोक्ता नियुक्त करण्यात आल्याने न्यायालयीन खटल्याचे कामकाज अधिक जलद गतीने चालेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी श्री गणेश पाटोळे, श्रीमती अमृता कांबळे, श्री. आशिष उल्हाळकर, श्रीमती उज्वला हेरवाडे,श्रीमती आरती पवार, श्री. मुकुंद काळदाते, श्रीमती स्वाती गव्हाणे या 7 जणांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती झाल्याचे सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता श्री. गजानन तोडकरी यांनी सांगितले.












