सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत च्या ग्रामनिधीमध्ये संगनमताने 72 लाख 81 हजार रुपये रक्कमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश कमलाकर धुरी ( रा. बांदा, ता. सावंतवाडी ) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला. तळवडे ग्रामपंचायत मध्ये 72 लाख 81 हजार रुपये रक्कमेच्या अपहार प्रकरणात प्रथमेश धुरी हा ठेकेदार आहेत. या गुन्ह्यातील तो सहआरोपी असून अटक टाळण्यासाठी त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्याला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी प्रथमेश चा अटकपूर्व जामीन फेटाळला.











