प्रयत्नात सातत्य ठेवा येणार दिवस आपलाच असेल ! – नायब तहसिलदार प्रतीक आढाव यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अच्युत रघुनाथ प्रभुतेंडोलकर स्मरणार्थ बक्षिस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी परिस्थितीचा बाहू करू नका,प्रयत्नात सातत्य ठेवा येणारा दिवस आपलाच असेल असा मौलिक कानमंत्र विद्यार्थ्यांना कुडाळचे नायब तहसिलदार प्रतिक आढाव यांनी शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये आयोजित कै. अच्युत रघुनाथ प्रभुतेंडोलकर स्मरणार्थ बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या योजनेचे दाते व झाराप येथील प्रतिथयश उद्योजक दिलीप प्रभुतेंडो लकर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप प्रभुतेंडो लकर ,सचिव मुकुंद धुरी,सावंतवाडी चे माजी प्राध्यापक एल.पी.पाटील, संस्था माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक सतीश साळगावकर ,संचालक बबन बोभाटे, मुख्याध्यापक सलीम तकीलदार,एकनाथ गवस,वासुदेव मेस्त्री, छायाचित्रकार विजय भिसे, तथा पालक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी नायब तहसिलदार प्रतिक आढाव यांनी आपले स्वानुभव कथन करत विद्यार्थ्यांना आपलं भविष्य आपणच घडवलं पाहिजे, कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा,चांगल्या मित्राच्या सहवासात रहा,आपण जर कष्ट घेण्याची तयारी दाखवली तर प्रभूतेंडोलकर कुटुंबियांनासारकी माणसं आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला सदैव तयार असणार चांगले अधिकारी बनण्याच स्वप्न पहा व पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा.याप्रसंगी विद्यार्थ्यांना गेली अनेक वर्षे तज्ञ मार्गदर्शन कारणारे आर.पी.डी. कॉलेज सावंतवाडीचे सेवानिवृत्त प्राध्यापक एल.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनेक छोटी- मोठे दाखले देत अभ्यासाचे महत्व समजावून सांगितले यावेळी त्यानी विद्यार्थ्यांनमध्ये स्पर्धा वाढविण्यासाठी रु.दहा हजारचा धनादेश बक्षिस योजनेसाठी संस्थेकडे सुपूर्द केला.यावेळी विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका वृषाली सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना पाटील सर व प्रभूतेंडोलकर कुटुंबियांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी विद्यार्थ्यांनामधून उस्फुर्तपणे निधी एकनाथ सावंत,सृष्टी नारायण सावंत, दुर्वा निलेश धुरी यांनी या योजनेचे भरभरून कौतुक करत विद्यार्थ्यांनमध्ये खऱ्या अर्थाने या योजनेमुळे सकारत्मक स्पर्धा वाढून विद्यालयाचा निकाल वाढीस चालना मिळाल्याचे सांगितले. यावेळी मागील दोन शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जवळ पास वीस हजार रुपये एवढया रकमेच्या पारितोषिकाचे वितरण प्रशस्तीपत्रकासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी केला तर सूत्रसंचालन वरिष्ठ सहाय्यक शिक्षक एकनाथ कांबळे व काशिनाथ बागेवाडी यांनी तसेच बक्षिसाचे वाचन सहाय्यक शिक्षिका सुप्रिया पेडणेकर यांनी तर आभार वरीष्ठ सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी मानले.

error: Content is protected !!