पकडायला गेला सिंगम..पण गब्बरच खात आला चींगम

संदीप सरवणकर यांची वाल्मिक प्रकरणावरून खोचक टीका

कणकवली (प्रतिनिधी) : बीड २२ दिवस तापल, विधान सभेत सत्ताधारी आमदारांनी ही झापल , कायद्याचे असतात लांब हात , जे अण्णा ला आणायला गेले, ते हात हलवत परत आले.आणि आण्णा स्वतःच्या गाडीतून आले, हजर झाले. त्या आधी ते चौथ्या स्तंभावर गरजले , “मी अटक पूर्व जामीन घेऊ शकलो असतो”.आणि सेशन – हाय कोर्टाचे नाताळ सुट्टी संपताच,मात्र आमच्या बीडचे अण्णा हे वाल्याचे वाल्मिकी होऊन कायद्याचे समोर चालत आले . खरतर, यात,” देवाचा” न्याय आणि पोलिस यंत्रणा ची सक्षमता ही २२ दिवस पणाला लागली होती. पण ,अण्णानी तर आपली मैत्री पणाला लावली ,हाच त्यांचा थोर पणा ..महाराष्ट्र ही त्यांना कधी विसणार नाही. आता , सगळेच पाहत राहतील. एक दिवस आण्णा हे निर्दोष मुक्त होतील आणि त्यांची गुन्ह्यात जप्त झालेली सर्व हत्यारे ही त्यांना सन्मानाने परत दिले जातील… खरच ,अण्णा.. तुमचे अपराध इतके घोर आहेत ? .पण ..आम्हाला दिसते की, “तुम्ही थोर आहेत”. हा ३१ डिसेंबर म्हणजे वर्ष अखेर हा तुमचा प्रकट दिन म्हणून आम्ही साजरा करू .

error: Content is protected !!