ठाणे येथील घरफोडी गुन्हेगाराच्या कलमठ मध्ये आवळल्या मुसक्या

हवालदार मिलिंद देसाई, अंमलदार रुपेश गुरव यांची कौतुकास्पद कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस स्टेशन मध्ये दाखल घरफोडी च्या गुन्ह्यातील आरोपीला कलमठ येथे कणकवली पोलिसांनी मोठ्या शिताफीने चतुर्भुज केले. 2 लाख 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने या घरफोडीत लंपास करण्यात आले होते. कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलिंद देसाई, पोलीस नाईक रुपेश गुरव यांनी ही धडक कारवाई शुक्रवार 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता कलमठ येथे केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात 5 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील सहआरोपी कलमठ परिसरात असल्याची माहिती ठाणे येथील पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत यांनी हवालदार देसाई याना कळवले. त्यानुसार पीआय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देसाई, पोलीस नाईक गुरव यांनी कलमठ मध्ये आरोपी च्या घरी शोध घेत त्याला ताब्यात घेत कणकवली पोलीस ठाण्यात आणले.

error: Content is protected !!