चिंदर ग्रामपंचायत, चिंदर केंद्रातील जिप शाळा यांच्या वतीने वनराई बंधारा….!

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, ग्रा. प. कर्मचारी यांचा उत्साही सहभाग

आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत चिंदर, चिंदर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर पालकरवाडी, गावठणवाडी, गावडेवाडी येथील वहाळावर वसुधरा अभियान अंतर्गत वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह पहायला मिळाला.

सरपंच नम्रता महंकाळ-पालकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, शिक्षक राजेंद्रप्रसाद गाड, निशिगंधा वझे, संतोष राठोड, पूजा विभुते, उज्वला पवार, विश्राम माळगावकर, समिर अपराज, रणजित दत्तदास, रोशनी फर्नांडीस, रोहित पाटील, राजू पालकर, एकनाथ पवार, विकास पाटील, सुभाष पाटील, समीर लब्दे, प्रिया पालकर, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!