कणकवली (प्रतिनिधी) : एमपीएससी ने 8169 जागांची संयुक्त ( कंबाईन) पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी घेण्याचे नियोजित केले आहे. या परीक्षेत शेवटच्या 40 दिवसात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी कोण कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास आणि अटेम्प गरजेचा आहे यासाठी युनिक अकॅडेमी ची ऑनलाईन – ऑफलाईन फास्ट्रॅक बॅच येत्या 26 मार्च पासून सुरु होत आहे. या बॅच मध्ये पुणे मुंबई चे तज्ञ मार्गदर्शक, विश्लेषणासह टेस्ट सिरीज, युनिकचे यशस्वी अधिकारी विद्यार्थी वर्गाचे मार्गदर्शन, अध्ययावत नोट्स आणि माफक फी सह मर्यादित जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. तरी या संयुक्त पूर्व परीक्षे साठी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांनी, शेवटच्या 40 दिवसात योग्य पद्धतीने अभ्यास व टिकून राहत यशस्वी होण्यासाठी या बॅच मध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन युनिक च्या वतीने संचालक सचिन कोर्लेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9689414974/9960658458 या नंबरवर संपर्क साधावा.