कणकवली पर्यटन महोत्सवात दिग्गज इंडियन आयडॉलचा असणार लाईव्ह परफॉर्मन्स

सलमान अली ऋषी सिंग सायली कांबळे नितीन कुमार पवनदीप अरुनीता चेतना भारद्वाज यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची सुवर्णसंधी

कणकवली (प्रतिनिधी) : 9 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान कणकवली पर्यटन महोत्सवाचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर करण्यात आले आहे. कणकवली पर्यटन महोत्सवाचे 9 जानेवारी रोजी मंत्री नितेश राणेंच्या हस्ते आमदार निलेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते. सलमान अली वुइथं ऑर्केस्ट्रा, 250 स्थानिक कलाकारांचा कनकसंध्या भव्य नाट्यप्रयोग, इंडियन आयडॉल फेम ऋषी सिंग सायली कांबळे नितीन कुमार यांचा ऑर्केस्ट्रा आणि समारोपाच्या दिवशी 12 जानेवारी रोजी इंडियन आयडॉल फेम पवनदीप आणि अरुनीता या फेमस गायक जोडीसह चेतना भारद्वाज यांचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे.

error: Content is protected !!