नवकिरण नाताळ विशेषांकाचे प्रकाशन

मसूरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या कथा आणी व्यथा मांडणारे तसेच कोकणातील सर्व धर्मियांचा बंधुभाव दृढ करणारे मुखपत्र अशी नवकिरणची ओळख आहे. मसुरे गावच्या फातिमा चर्चच्या वार्षिक सणाचे निमित्त साधून हा अंक वसईचे धर्मगुरू फादर अमृत यांच्या हस्ते नवकिरण 2024 नाताळ अंकाचे मोठया थाटात प्रकाशन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर धर्मगुरू तसेच नवकिरण चे संपादक विल्यम फर्नांडिस आणी पास्कॉल लोबो उपस्थित होते.

error: Content is protected !!