भालाफेक मध्ये वृषाली गजोबार, संदिप घाडी तर बॅडमिंटन स्पर्धेत सुस्मिता चोरगे ठरले प्रथम द्वितीय क्रमांकाचे मानकरी
वैभववाडी (प्रतिनिधी) : नगरविकास विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत वेंगुर्ला येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवा अंतर्गत घेण्यात आलेल्या भालाफेक या खेळ प्रकारात महीला गटात वृषाली गजोबार हिने प्रथम क्रमांक पटकावला तर पुरुष गटात संदिप घाडी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच बॅडमिंटन या खेळ प्रकारात सुस्मिता चोरगे यांनी महिला गटात द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना वेंगुर्ला येथे मधुसूदन कालेलकर सभागृहात पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल वाभवे वैभववाडी नगरपंचायत चे नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी अभिनंदन केले.या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.













