मंत्री नितेश राणे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या कार्यकर्त्यांसह कणकवली घेतली सदिच्छा भेट

नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या कार्यकर्त्यांसह कणकवली शासकीय विश्रामगृह येथे सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सदर भेटी दरम्यान नवीन कुर्ली गावाच्या विकासाचा दृष्टीने काही कामे असतील तर आवश्यक ते सहकार्य करण्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेचे रविंद्र नवाळे, आनंद सावंत, सखाराम हूंबे, आशिष पेडणेकर, चंद्रकांत तेली, एकनाथ चव्हाण, राजेंद्र तेली, गणेश तेली, दाजी सुतार, अनंत दळवी, शंकर राणे, संतोष सुद, अंकुश पोवार, मधुकर परब, जयवंत कामतेकर, निखिल चव्हाण, प्रवीण पार्टे, मनोहर कदम, शांताराम पार्टे, जनार्दन पोवार, विजय परब, संतोष हसणेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!