70 लाखाच्या अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोन्ही आरोपींना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

ऍड. मिलिंद सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : 70 लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची अवैध दारु वाहतुकीच्या गुन्ह्यातील सहआरोपी जितेंद्र सिंग उर्फ मुन्ना सुरज सिंग पटवा आणि अजय शालिकराव नंदूरकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायाधिश यांनी मंजूर केला. आरोपींच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला. 15 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजता मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर मधून 70 लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने पकडली होती. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत. या गुन्ह्यातील आरोपी तौसिक नियाज अहमद रा नागपूर याला घटनास्थळी पकडून अटक करण्यात आली होती. तर सहआरोपी
जितेंद्र सिंग उर्फ मुन्ना सुरज सिंग पटवा अजय शालिकराव नंदूरकर हे पसार झाले होते. त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होऊन ऍड मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपींची वैयक्तिक 25 हजार रुपये तसेच पोलीस स्टेशन ला हजेरी लावणे तपासात सहकार्य करणे आदी अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

error: Content is protected !!