कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना परवानगी देण्यात आली आहे. नियम आणि अटीसह जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत गडावर जाता येणार आहे. पर्यटकांची तपासणी करूनच गडावर सोडले जाणार आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर तब्बल पाच महिन्यांनी विशाळगड पर्यटकांना खुला करण्यात आला आहे.
तब्बल पाच महिन्यांनी विशाळगड पर्यटकांना खुला












