त्वरित एटीएम सेवा सुरू न केल्यास मनसे स्टाईल ने उत्तर दिले जाईल – मनसे जिल्हा सचिव सचिन तावडे
एक महिन्याच्या आत एटीएम सेवा सुरू करु असिस्टंट जनरल मॅनेजर अरुण कुमार जैन यांचे आश्वासन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेची एटीएम सेवा गेल्या वर्षी पासून बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपूर्वी बॅंक शाखेत चौकशी केली असता एटीएम मशीन चे काही पार्टस खराब झाले आहेत ते मागवले असुन ते आल्यावर एटीएम सेवा सुरू होईल असे सांगण्यात आले पुन्हा सहा महिने उलटले तरी सेवा बंद असल्याने चौकशी केली असता बॅंक शाखेचे नुतनीकरण करण्याचे कारण देण्यात आले बॅंक नुतनीकरण होऊन देखील अद्याप सेवा सुरू न झाल्याने आज वैभववाडी तालुका मनसे च्या वतीने स्टेट बँक शाखेत जाऊन याबाबत जाब विचारण्यात आला. एटीएम सेवा देता येत नसेल तर ग्राहकांना एटीएम वितरण करता कशाला सेवा देता येत नसेल तर बॅंक शाखाच बंद करा असे खडेबोल जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी बॅंक प्रशासनाला सुनावले तसेच लवकरात लवकर एटीएम सेवा सुरू करा अन्यथा मनसे स्टाईल ने उत्तर देण्यात येईल असा इशारा जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी बॅंक प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. त्यावेळी जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी बॅंक असिस्टंट जनरल मॅनेजर अरुण कुमार जैन रत्नागिरी डिव्हिजन यांच्याशी फोन द्वारे संभाषण केलं त्यांनी एक महिन्याच्या आत तालुक्याला एटीएमच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ऍडव्होकेट प्रताप सुतार, तेजस साळुंखे ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग सदस्य, जयवंत पळसुले ग्राहक मंच सदस्य, रुपेश वारंग तालुकाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना वैभववाडी. उपस्थित होते













