ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ग्रामीण दुर्गम भागातील नागरीकांना पोलीस दलाचा नागरीकांशी थेट संवाद व्हावा त्याचप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ विषयक डायल 112 हेल्पलाईन, जनजागृती विशेषतः जेष्ठ नागरीक, महिला व बालके यांची सुरक्षा नागरीकांच्या तक्रारीचे त्वरीत निरसण करण्यासाठी दि. 9 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ आज कुडाळ तालुक्यातील शिवापुर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पंटागणात कार्यक्रम पार पडला.यावेळी गावाच्या वतीने पारंपारीक पध्दतीने पोलीस अधीक्षक साैरभकुमार अग्रवाल यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यामध्ये पोलीस विभागाव्यतीरीक्त इतर विभागांच्या अडी-अडचणी उपस्थित ग्रामस्थ व महिलांकडुन जाणुन घेवुन त्यासंबधाने संबधीत विभागास पत्रव्यवहार करुन सोडविणेकामी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी आश्वासित केले. तसेच पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी यांनी स्वतःहुन शिवापुर सारख्या दुर्गम गावात येवुन ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या अशी बाब प्रथमच शिवापुर गावामध्ये घडलेल्या असल्याचे जाणकार गावकऱ्यांचे म्हणणे मांडले व सदर उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
गावसंवाद उपक्रमास शिवापुर गावचे संरपंच, उपसंरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक, तलाठी, कोतवाल, ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, माजी सैनिक, जेष्ठ नागरीक, पोलीस पाटील, सेवानिवृत्त पोलीस अमंलदार, ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, महिला, शिक्षक व मुले सहभागी सहभागी झालेले होते.त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील रेवंडी गावात, कणकवली तालुक्यातील जानवली व फोंडा गावात, दोडामार्ग तालुक्यातील झिरोडे, आंबडगाव व माटणे गावांत तसेच बांदा येथे संबधीत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी गावभेट घेवुन नागरीकांचे समस्यांचे निरसण केलेले आहे.
सदर उपक्रमामध्ये जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील अन्य प्रशासकिय विभागाचे अधिकारी यांनी तसेच पत्रकार, स्वयंसेवी संस्था, नागरीक, विद्यार्थी, शिक्षक, गावातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी इ. उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस दलाचे वतीने करण्यात येत आहे.












