वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ, सिंधुदुर्गचे ३४ वे सिंधब्रम्ह संमेलन रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५  रोजी, पूर्ण प्राथमिक शाळा ब्राम्हण देववाडी नाधवडे ता. वैभववाडी येथे मंडळाचे अध्यक्ष अरुण गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न होत आहे.    यनिमित्त दिनांक १२ रोजी सकाळी ७. ३० वा. श्री गणेश पूजन, शांतीपाठ, गोपूजन, सकाळी ८. ३० वा. ध्वजरोहन, सकाळी ९ वा. नाव नोंदणी व अल्पोहार, सकाळी ९. ३० स्वागत समारंभ, सकाळी ९. ४० वा दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित यांच्या हस्ते संमेलन उदघाटन होणार आहे. यावेळी दीप प्रज्वलन, परशुराम पूजन, वेधघोष करण्यात येईल. तसेच ९. ५० वा. प्रास्ताविक व अहवाल वाचन, उदघाटक मनोगत, सकाळी १०. १० वा वैभववाडी तालुकास्तर पुरस्कार, जिल्हास्तरीय सत्कार, ब्राम्हण मंडळ परिवार संस्थाची माहिती, बक्षीस वितरण असे कार्यक्रम होणार आहेत. तर ११. ३० वा. माजी मुख्याध्यापक श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्य. विद्यालय जामसंडे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी १२. १५ वा. विद्यागौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. तर अध्यक्ष अरुण गोगटे यांच्या अध्यक्षीय भाषांण होणार आहे. त्यानंतर आभार स्नेहाभोजन होणार आहे.    

तर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी तीन ते चार या वेळेत परस्पर परिचय करण्यात येणार आहे. ९ ते १०. ३० या वेळेत स्तोत्र पठण स्पर्धा अंतिम फेरी संमेलन स्थळी होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष विघ्नेश गोखले, जिल्हा कार्यवाह दत्तात्रय पुराणिक, जिल्हा सहकार्यवाय विनोद गगनग्रास, संदीप मणेरिकर वैभववाडी अध्यक्ष रामानंद गणपत्ये यांनी केले आहे.

error: Content is protected !!