मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची मसूरे शाळेला सरप्राईज भेट !

मसुरे (प्रतिनिधी) : मसूरे केंद्रशाळा येथे विध्यार्थ्यांना ‘सेफ्टी अँड सिक्युरिटी’ बाबत मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद झाल्याने मुले भारावून गेली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मुलांना शैक्षणिक, तसेच जनरल नॉलेज वरील विविध प्रश्न विचारत बहुमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी मसुरे पोलीस विवेक फरांदे, निवृत्त पोलीस राजन परब, पोलीस पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी राजन परब, मसुरे पोलीस विवेक फरांदे, पोलीस पाटील सोमा ठाकूर, सुरेखा गावकर, प्राजक्ता पेडणेकर, ऐशाबी सय्यद, प्रेरणा येसजी, अभिजित दुखंडे, साईप्रसाद बागवे, शशांक ठाकूर, नेवेश फर्नांडीस, सोनल भोगले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!