आनंदाची बातमी ! करूळ घाटरस्त्यातून आठवड्याभरात होणार एकेरी वाहतूक सुरू

मत्सोद्योग मंत्री नितेश राणेंची पत्रकार परिषदेत माहिती

करूळ घाटरस्ता कामाचा क्वालिटी कंट्रोल अहवाल प्राप्त ; सूचनांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : 28 डिसेंम्बर 2024 रोजी जिल्हाधिकारी हायवे अधिकारी आणि पिडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी करूळ गगनबावडा घाटरस्त्याची पाहणी केली होती.जोवर रस्त्याचे दर्जेदार काम होत नाही, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड राहणार नाही याची खात्री झाल्यानंतर करूळ घाटमार्गे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.वाहतूक महत्वाची आहेच पण अपघात होऊन जीवितहानी होऊ नये याची खबरदारी महत्वाची आहे. निवडणुकीत करूळ घाट रस्त्यावरून माझ्यावर टीकाही झाली. विरोधकांच्या सकारात्मक टीकेचा फायदा जनतेला होत असल्यास आम्ही त्याचेही स्वागत करतो. करूळ घाट रस्त्याबाबत शून्य अपघात हे ध्येय असले पाहिजे.मी स्वतः क्वालिटी कंट्रोल खात्याला संपर्क साधून करूळ घाट रस्त्याच्या झालेल्या कामाचा रिपोर्ट मी मागवला आहे.या रिपोर्ट मधून रस्त्याचा दर्जा किंवा काही त्रुटी असल्यास समजतील. 9 जानेवारी रोजी हायवे अधिकारी संतोष शेलार यांनी करूळ घाट रस्त्याची पाहणी करून अहवाल मला दिला आहे. या अहवालातील निर्देशानुसार तीव्र वळणे आहेत तिथे संरक्षक भिंती व आवश्यक उपाययोजना करणे, जिथे डोंगराकडील बाजू तोडण्यात आली आहे तेथील लूज मटेरियल बाजूला करावे, सुरक्षा अहवाल आल्यानंतरच करूळ घाट रस्त्यावरून वाहतूक सुरू करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.या सूचनांची अंमलबजावणी झाल्यानंतर काही दिवसांतच करूळ गगनबावडा घाटमार्गात वैभववाडी तुन गगनबावडा कडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल असे मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधकांनी आंदोलनाच्या निमित्ताने वाहतुकी चे प्रयोग करू नयेत.विरोधकांचेही जीव त्यांच्या कुटुंबियांना आणि आम्हाला महत्वाचे आहेत. कारण विरोधक असले तरच आम्हालाही काम करताना आनंद आहे अशा शब्दांत राजकीय विरोधकांना मंत्री राणे यांनी चिमटे काढले.

error: Content is protected !!