“मला आई बाबा हवेत..” व ‘कॉमेडी चेटकीण ‘ बालनाटिका सादर
ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांची प्रमुख उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे येथे याच शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली व लेखक दिग्दर्शक निर्माता अभिनेते प्रवीण भारदे यांचा अभिनय असलेली तसेच भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री यांच्या प्रमुख अभिनयाने नटलेली “मला आई बाबा हवेत’ आणि कॉमेडी चेटकीण ही बाल नाटिका नुकतीच ११ जानेवारी २०२५ रोजी नडगिवे इंग्लिश मिडीयम च्या भव्य पटांगणावर संपन्न झाली.
माता अनुसया प्रोडेक्शन मुंबई यांच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व नडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष मनोज गुळेकर यांच्या सौज्यन्याने नडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा २ तासांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.यावेळी नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे संचालक मोहन कावळे,राजेंद्र ब्रम्हदंडे,विजय कळंत्रे,निवृत्त पोलिस अधिकारी कांतीलाल कोथिंबिरे, विलास फराक्टे, नडगिवे सरपंच सौ माधवी मण्यार,वारगाव उपसरपंच नाना शेट्ये,युवा उद्योजग तेजस जमदाडे नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याद्यापीका श्रीम.डांगे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्कूलच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे व अभीनेते प्रवीण भारदे यांचा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व संस्थेचे संचालक कांतीलाल कोथिंबिरे यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर बाल नाटीकेमध्ये सहभागी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनेत्री नयना आपटे यांचे शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
“शालेय विद्यार्थ्यांचा सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल ने उचलले पाऊल निश्चितच गौरवास्पद असून यातून भविष्यातील चांगले कलाकार घडतील व उदयास येतील.असे भावपूर्ण उदगार पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री व कॉमेडी चेटकीण नाटकातील प्रमुख अभिनेत्री नयना आपटे यांनी नाटकाच्या शो दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. यावेळी मोठ्या संख्येने पालक.विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

















