खासदार नारायण राणे, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
शिर्डी (प्रतिनिधी) : शिर्डी येथे देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे महाविजय प्रदेश अधिवेशन पार पडले. याप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री, भाजपचे खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
















