चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

चिंदरची सुकन्या शुभ्रा सिताराम हडकर सुवर्ण पदकाची मानकरी !

इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (IMO) मध्ये सुवर्ण पदक

शुभ्रा रोझरी इंग्लिश स्कूल मालवणची विद्यार्थिनी

आचरा (प्रतिनिधी) : वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे १२ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (IMO) मध्ये चिंदर गावची सुकन्या व रोझरी इंग्लिश स्कूल मालवणची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. शुभ्रा सिताराम हडकर हिने मॅथेमॅटिक्स विषयात ७१.६२% गुण प्राप्त करत कुडाळ केंद्रात अव्वल स्थान प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. शुभ्रा हडकर हि चिंदर सोसायटीचे चेअरमन सिताराम उर्फ देवेंद्र चद्रकांत हडकर यांची कन्या आहे. या यशा बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!