वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील बस स्थानकात शौचालयाची सुविधा नसल्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या प्रवाशांची विशेषता स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे तरी बस स्थानकात शौचालयाची व्यवस्था करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वैभववाडी यांच्यावतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक एसटी विभाग कार्यालय कणकवली यांच्याकडे केली आहे वैभववाडी येथे असलेले बस स्थानक हे तालुक्याच्या मुख्यालया असल्यामुळे दररोज हजारो प्रवासी शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी हे एसटी बससाठी बस स्थानकात येत असतात तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ही बस स्थानकात थांबतात परंतु बस स्थानकामध्ये शौचालय व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे शौचालय शौचालय नसल्यामुळे विशेषता स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांची मोठी कुचंबना होत आहे तरी वैभववाडी बसस्थानकात सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वैभववाडी यांच्यावतीने विभाग नियंत्रक कणकवली यांच्याकडे केली आहे वैभववाडी वाहतूक नियंत्रक श्री बाबू भुरके यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी ज्येष्ठ सेवा संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण रावराणे,वामन नारकर, बाळा माईणकर,गणेश मसूरकर, प्रकाश जैतापकर,सुरेश शिंगरे यांच्यासह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
वैभववाडी एसटी बस स्थानकात शौचालयाअभावी गैरसोय











