खेळाडूंचा जिल्हा म्हणून ओळख व्हावी – निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील २४ राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार संपन्न

तळेरे (प्रतिनिधी) : बुद्धिजीवी लोकांचा जिल्हा ,गुन्हेगारी मुक्त जिल्हा, पर्यटन व सांस्कृतिक जिल्हा म्हणून जशी ओळख आहे, याचप्रमाणे भविष्यात खेळाडूंचा जिल्हा म्हणूनही सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेगळी ओळख व्हावी अशी सदिच्छा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी राज्य व राष्ट्रीय खेळाडूंच्या सत्कार समारंभात व्यक्त केली.

ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस अर्थात राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय सिंधुदुर्गवतीने जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय खेळाडूचा सत्कार जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाला.याप्रसंगी मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड,सचिन रणदिवे,शितल शिंदे,क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, वरिष्ठ लिपिक आनंदा सुरेकर, दोडामार्ग तालुका समन्वयक हनुमंत सावंत,कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड आदी मान्यवर उपस्थित होते.सुकटे पुढे म्हणाले की,राज्यातील लहान जिल्हा असूनही क्रीडा क्षेत्रात कार्य मोठे आहे.ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठे टॅलेंट असून त्यांना प्रोत्साहनाची, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.आजची सत्कारमूर्तीची २४ ही संख्या पुढील वर्षी दुप्पट व्हावी यासाठी पालक,मार्गदर्शक,क्रीडा शिक्षक आणि क्रीडा कार्यालयाने खेळाडूंना पाठबळ द्यावे अशी आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

खाशाबा जाधव यांचे जीवनकथा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचा शुभारंभ ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला.प्रास्ताविक क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड यांनी करताना खाशाबा जाधव यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत उपस्थित राज्य,राष्ट्रीय खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले.

सत्कारमूर्ती खेळाडू पुढील प्रमाणे-
राष्ट्रीय खेळाडू- कु.भूमी सावंत -सॉफ्टबॉल खेळाडू (न्यू इंग्लिश स्कूल भेडशी), सुरज देसाई -सॉफ्टबॉल खेळाडू (सरस्वती विद्यामंदिर कुडासे),कु.आक्सा शिरगावकर -आर्चरी खेळाडू(पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली), दर्शन पडते -मैदानी भालाफेक खेळाडू (एस.एल.देसाई विद्यालय, पाट)

राज्यस्तरीय गुणवंत खेळाडू-
कु.प्रणिता आयरे, स्वप्निल लाखे – कॅरम खेळाडू (आर पी डी हायस्कूल सावंतवाडी),कु.आस्था लोंढे, राम फाले,अमूल्य घाडी -सर्व कॅरम खेळाडू (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), शुभम राठोड -ज्यूदो खेळाडू(कासार्डे माध्यमिक विद्यालय,कासार्डे), वेदांत वायंगणकर- कॅरम खेळाडू-(कासार्डे ज्युनिअर कॉलेज), बाळा गवस- सॉफ्टबॉल खेळाडू (सरस्वती विद्यामंदिर कुडासे), रवींद्र दळवी- किक बॉक्सिंग खेळाडू (राजा शिवाजी विद्यालय विलवडे), निशाद मांडवे -कुस्ती खेळाडू (महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा), पारस बांदेलकर, मानस बांदेलकर, रुद्र सुलोकार-जलतरण खेळाडू ,(सर्व डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस),कु.साक्षी गाड-जलतरण खेळाडू (वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा), कु.श्रेया महाडिक- कॅरम खेळाडू (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), सृष्टी गुडेकर -कराटे खेळाडू (माध्यमिक विद्यामंदिर,कनेडी), सौरभ दुखंडे -क्रिकेट खेळाडू (न.शा.पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय,देवगड)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांनी केले तर शेवटी आभार कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी मानले.

error: Content is protected !!