साळेल येथे मसाला व पिठे बनविणे व्यवसायाचा शुभारंभ

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत महिलांना लाभ

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील साळेल येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत विविध मसाले व पीठे तयार करणे या व्यवसायाचा शुभारंभ मालवण तालुका कृषी अधिकारी श्री गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री.लंबे, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, साळेल सरपंच रविन्द्र साळकर, ग्रामपंचायत सदस्य संपदा गावडे, कृषी सहायक सौ. गीते,भरत गावडे, रोशन गावडे, गायत्री गावडे, पूजा गावडे, गणेश गावडे, बजरंग गावडे, सतिश गावडे, उत्तम गावडे, साक्षी गावडे, वगैरे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कृषी अधिकारी श्री गोसावी यांनी पूजा गावडे यांच्या प्रमाणे साळेल गावातील इतर ग्रामस्थांनी या शासनाच्या योजनेअंतर्गत विविध व्यवसाय साळेल गावात सुरू करावेत असे सांगितले.

error: Content is protected !!