तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवात नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी शाळेचे सुयश

समुहगान, रिले सह ज्ञानी मी होणार या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचा पटकावला मान

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्यामंदिर ऐणारी शाळेमध्ये तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव २०२४-२०२५ संपन्न झाला. या महोत्सवात खो खो, कबड्डी, धावणे, उंच उडी, गोळा फेक, रिले तसेच समूहगीत, समूहनृत्य व ज्ञानी मी होणार इत्यादी स्पर्धा पार पडल्या. या क्रीडा महोत्सवामध्ये ज्ञानी मी होणार स्पर्धेच्या लहान गटात नाधवडे ब्राह्मदेव नवलादेवाडी शाळेच्या दुर्वा संदीप कोळेकर व रिद्धी संतोष इस्वलकर या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला तर नाधवडे सरदारवाडी शाळेच्या मुलांनी ज्ञानी मी होणार स्पर्धेच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच लहान गट ५०×४ रिले खेळ प्रकारात सोनल सचिन कांबळे हिच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या यशात भर घातली. समूहगान स्पर्धेच्या मोठ्या गटात देखील शाळेच्या गीत गायन बालचमुने यावर्षी प्रथम येण्याची परंपरा कायम राखली आहे.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा उपसरपंच गोपाळ कोकाटे, शाळा समिती चेअरमन श्रीपाद उर्फ बाप्पी मांजरेकर, माजी सभापती वैभववाडी, सुधीर नकाशे माजी जि.प. सदस्य, दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर माजी उपसभापती वैभववाडी, पुरुषोत्तम कोकाटे शाळा समिती सल्लागार, सूर्यकांत शंकर कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य, वनिता कांबळे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पंढरीनाथ सावंत, संदीप कोळेकर, सुजाता कुडतरकर यांचे देखील कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!