1 का नब्बे….मटका पुन्हा तेजीत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत वक्तव्य केल्यानंतर कणकवलीतील मटका गेले दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. कणकवली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर खुलेआम मटका सुरू असताना या मटक्यावर कारवाई होत नव्हती. मात्र आता पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील त्या इशाऱ्यानंतर अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील मटका दोन दिवस बंद ठेवत याबाबत मटका व्यावसायिकांकडून घाबरल्यासारखी स्थिती निर्माण करण्यात आली. परंतु आज शुक्रवार पासून पुन्हा मटका कल्याण सुरू झाला असून, कणकवली पोलीस आता याप्रकरणी काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!