इथरनेट एक्स्प्रेस फौंडेशन आणि थॉमस स्टीफन्स कोंकणी केन्द्र कडून विवेकानंद एन्जल पुरस्काराने संदिप परब यांचा गौरव
खारेपाटण (प्रतिनिधी) : “स्वामी विवेकानंद यांनी जगातील सा-या मानवजातीला बंधुभाव विचार दिला. मानवतेची मोलाची शिकवण दिली. कुणाच्याही जाती धर्माचा विचार न करता निराधार वंचित बांधवाना माणुसकीचे जीवन मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने, संवेदनशील नागरिकांच्या सहाय्याने जीवन आनंद संस्थेद्वारे कार्य करीत आहे. विवेकानंदांच्या मानवतेच्या विचार कार्याला आपण सगळे मिळून आपल्या परीने रोजच्या जीवनात जगण्याचा प्रयत्न करूया. प्रत्यक्षात आणूया” असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी केले. गोव्यातील इथरनेट एक्स्प्रेस फौंडेशन ने थॉमस स्टीफन्स कोंकणी केन्द्र, परवरिम येथे संदिप परब यांना विवेकानंद एन्जल अवॉर्ड प्रदान करण्यात आले. त्यावेळी काढले.
या कार्यक्रमात प्रसंगी संदिप परब यांचेसह, ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा फौंडेशन च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देवून सहाय्य करणारे दुर्गादास परब, गोव्यातील हस्तकला कारागिरांना सहाय्य करून दुर्मिळ होत चाललेल्या हस्त कला कौशल्याच्या संवर्धनासाठी कार्य करणारे विक्टर हुगो गोम्स, संवेदना केन्द्राच्या माध्यमातून वनमारे आदिवासी जमातीतील वंचित बालकांसाठी कार्य करणारे नमन सावंत दावोस्कर यांनाही विवेकानंद एन्जल अवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यसैनिक व गोव्यातील पर्यटन आणि माहिती विभागाचे पहिले संचालक, गोव्यातील होम सायन्स कॉलेज आणि महिला सहकारी बॅंकेचे संस्थापक ऍड. लिबिया लोबो सरदेसाई हे यावेळी उपस्थित होते. यावेळी रस्त्यावरील निराधार बेघर वंचित लोकांसाठी कार्य करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.












