खान अकॅडमी पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षण सारथी उपक्रमात

जि.प.केंदशाळा खारेपाटण नं १ चा राज्यातील टॉप १० शाळांमध्ये समावेश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खान अकॅडमी पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातील शाळांतील विद्यार्थ्यांचा गणित अध्ययन संपादन वृद्धी कार्यक्रम सन – २०२४ – २५ शिक्षण सारथी महोत्सव आर्थात शैशणिक शेत्रावर आधारित ऑनलाईन कार्यक्रम दि.९ डिसेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत घेण्यात आला होता. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचा राज्यातील १० टॉप टेन शाळामध्ये समावेश झाला असून या शाळेचे त्यामध्ये सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जि.प.केंद्र शाळा ही राज्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेली शाळा असून या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी खारेपाटण केंद्र शाळा विजेता झाल्याची माहिती दिली. याबाबत खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव केंद्रप्रमुख संजय पवार, विस्तार अधिकारी कैलास पवार गट शिक्षण अधिकारी किशोर गवस यांनी खारेपाटण केंद्र शाळेचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष संध्या पोरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांनी देखील शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

एस सी ई आर टी पुणे व खान अकॅडमी पुणे तसेच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आलेला होता. तर खानत् अकॅडमी मुंबई यांच्या एका टीमने दी.२१ डिसेंबर २०२४ रोजी खारेपाटण जि.प.केंद्र शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन शाळेची पाहणी केली होती व शाळेच्या इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन टॅब द्वारे गणितावर आधारित स्वाध्याय सोडवून घेतला होता.यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. याचा निकला नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून खारेपाटण केंद्र शाळा राज्यातील टॉप १०- दहा शाळांमध्ये विजेती ठरली आहे. यातील विजेत्या शाळांमधील गणित विषयाच्या शिक्षकांना ३०० रुपये किमतीचे अमेझॉन व्हावचर देण्यात येणार असून लकी ड्रॉ च्या माध्यमातून राज्यात टॉप १० ठरलेल्या १० शाळांना ५००० रुपये किमतीचे गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!