कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलिसांनी कणकवली शहरातील मटका बुकीवर कारवाई करत रोख रक्कम व अन्य साहित्य जप्त केले आहे. पटकीदेवी बौद्धवाडी नजीक पत्र्याच्या स्टॉल मध्ये दुपारी 1 वाजून 10 मिनिटे कल्याण मटका खेळवत असताना मनोज तात्या हर्णे ( वय 45 रा पटकीदेवी मच्छी मार्केट कणकवली ) याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल राजकुमार आघाव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश शेडगे, हवालदार सुभाष शिवगण, कॉन्स्टेबल राजकुमार आघाव यांनी ही कारवाई केली.
मटका बुकीवर कणकवली पोलिसांची कारवाई ; 3900 रुपये जप्त











