एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज, कणकवली याठिकाणी दिनांक २3 जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमावर एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नाकांत ढोबळे, तसेच सहायक मोटर वाहन निरीक्षक अमित नाईकवडी आणि अमित पाटील उपस्थित होते.

कार्यशाळेत रस्त्यावर चालताना, वाहने चालवताना सुरक्षितता कशी बाळगावी आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना अमित नाईकवडी पुढे म्हणाले, प्रामुख्याने आपला प्रवास सुखकर होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, वाहतुकीच्या नियमांचे पालन कसे करावे. वाहनांची देखभाल, तसेच हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व, गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये अपघात प्रसंगी मदतकार्य कशा पद्धतीने करावे. सर्व नियम पाळलात तर अपघाताची संख्या कमी होऊन प्रत्येकाचा जीव वाचेल. या सर्वांबद्दल प्रश्न उत्तरांच्या रुपात फार मोठे मार्गदर्शन परिवहन अधिकाऱ्यांनी केले.

हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. यासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. महेश साटम, एनएसएस समन्वयक प्रा. अरविंद कुडतरकर, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.डॉ. शुभांगी माने, सर्व विभाग प्रमुख,शिक्षकवर्ग, आणि शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याकरिता महाविद्यालयाचे संस्थापक खा. नारायण राणे, अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे, आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाढकर यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तनया पांचाळ, कु. श्रुती सुतार तर नियोजन कु. विकी राठोड, कु. ललित कासवकर आणि त्यांच्या सहकार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

error: Content is protected !!