व्यापारी रत्नाकर कदम यांच्या प्रामाणिकपणाचे एपीआय अवसरमोल यांनी केले कौतुक
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारपेठेमध्ये पेंटिंगचे मजुरीवर काम करणाऱ्या हरिश्चंद्र रामकुमार राव याचे पैसे असलेले पाकीट हरवले होते. त्यामध्ये 13 हजार 400 रुपये इतकी रक्कम होती ते पाकीट वैभववाडी व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष रत्नाकर कदम यांना सापडले. रत्नाकर कदम यांनी प्रामाणिकपणे सापडलेले पैशांचे पाकीट वैभववाडी पोलीस ठाणे येथे आणून जमा केले. पोलिसांनी चौकशी करत शोध घेतला असता सदर पाकीट हरिश्चंद्र राव याचे असल्याचे समजले. हरिश्चंद्र राव याला सदर रोख रक्कम असलेले पाकीट वैभववाडी पोलीस ठाण्यात राव याच्याकडे सुपूर्त करण्यात आले. एपीआय सुनील अवसरमोल यांच्याकडून रत्नाकर कदम यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी महिला पोलीस हवालदार भुसांडे महिला पोलीस हवालदार गोसावी पोलीस कॉन्स्टेबल अजित पडवळ, संदीप राठोड आणि व्यापारी सोमनाथ महाजन उपस्थित होते.












