ब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पोचा अपघात

दोडामार्ग (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील धोकादायक घाट अशी ओळख असलेल्या तिलारी घाटात गेल्या काही महिन्यात अपघाताचे सत्र सुरू झाले. कोल्हापुरातून गोव्याकडे जाणार्‍या एका ताडपत्री वाहतूक करणार्‍या मिनी टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो तिलारी घाटातील रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील दोघेही सुखरूप बचावले. मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे. तिलारी घाटात धोकादायक वळण चढ-उतार तसेच धोकादायक वळणे यामुळे अपघात घडत आहेत. यात नवीन चालक यांना घाटातील रस्त्याचा अंदाज नसल्याने सुसाट वाहन सोडून देतात आणि अशाप्रकारे अपघाताला सामोरे जातात, तेव्हा बांधकामविभाग येणे, आवश्यक सूचनाफलक तसेच वेग लिमिटेड संदर्भात सूचना फलक लावावे अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!