नरेंद्र उद्यान बनतंय जुगारींचा अड्डा ; पोलिसांकडून कारवाईची जनतेची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील पर्यटन स्थळ असलेल्या नरेंद्र डोंगर उद्यान हे अंदर बाहर जुगार खेळणाऱ्या जुगारींचा अड्डा बनत चालले असून यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात अनैतिक , अवैध धंद्यांना थारा नाही असे ठणकावून सांगत कठोर कारवाईच्या सूचना पोलीस दलाला दिल्या आहेत. नरेंद्र डोंगर उद्यान हे सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मॉर्निंग वॉक आणि ईव्हीनिंग वॉक लाही याठिकाणी शहरातील नागरिकांची पसंती असते. मात्र काळोख पडताच येथे रात्रीचा अंदर बाहर जुगार खेळ सुरू होतो. या जुगारावर कारवाई करावी अशी अपेक्षा स्थानिक जनतेतून होत आहे.

error: Content is protected !!