गणपती बाप्पा मोरयाsss च्या जयघोषात फोंडाघाट, श्रीराधाकृष्ण मंदिरामध्ये गणेश जन्म उत्साहात !

बालगोपाळांच्या साक्षीने आणि ॲड. विवेक गोखले यांच्या महोत्कट व्याख्यानाने भाविक चिंब

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील श्रीराधाकृष्ण मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने,समस्त भाविकांचे उपस्थित संपन्न झाला. महोत्कट व्याख्यानाच्या विषयावरील ॲड. विवेक गोखले यांचे निरूपण त्यामध्ये गणेश जन्माची आवश्यकता, कश्यप मुनी आणि माता अदितीची आराधना, कडक डोहाळे, मोदक खाण्याची इच्छा, गणेश जन्म, त्याच्या बाललिला, आणि अखेर देवांकडून वर मिळाल्याने उन्मत्त झालेल्या प्रवृत्तीचा गणेशाकडून विनाश ! अशा विविध दाखल्यासह सध्याच्या परंपरांना स्पर्श करीत, कवणा च्या साथीने त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यांना कीर्तनामध्ये तबला मारुती मेस्त्री, हार्मोनियम आदित्य नेवरेकर, मृदंग साई साटम यांनी उत्कृष्ट साथ दिली. गणेश जन्मावेळी गणपती बाप्पा मोरया ssss च्या जयघोशात, गणेश जन्माचा पाळणा, आरती आणि सुंटवडा, मोदकाच्या प्रसादाने, माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन बालगोपाळ मंडळींनी यथायोग्य केले होते.

error: Content is protected !!