तारेवरची कसरत अर्थमंत्र्यांनी ६८ टक्के जिंकली !

कोकणासाठी ५ योजनेमधून लाभ होणार – प्रा. उदय बोडस

आचरा (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच्या २०२५ च्या अर्थसंकल्पात, मंदावलेला विकासाचा वेग, घटता परकीय चलनसाठा आणि बदलत्या जागतिक वातवरणात भारतीय उद्योगांचे हित राखणे या आव्हानांना तोंड देण्याची कसरत ६८ टक्के जिंकण्यात आली आहे. व्यक्तिगत आयकरात भरीव सवलत देऊन उत्पन्न सोडताना नवीन उत्पन्न स्रोत शोधलेले नाहीत. या अर्थसंकल्पात एकूण ५ योजना कोकणासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उपयुक्त आहेत.

शेतीचा विस्तार आणि उत्पादकेत वाढ करण्याचा निर्धार, लघुउद्योगांमधून साडे सात कोटी रोजगार, स्टार्ट अपच्या कर्जाची मर्यादा दुप्पट, वैद्यकीय आणि धार्मिक पर्यटनासाठी विशेष योजना, नवीन आयकर विधेयक सादर करणार वीमा क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणूक, अप्रत्यक्ष करात ७ दर आणि ८२ गोष्टींवर सरचार्ज हटवले, ३६ औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली, भारतीय उद्योगांना चालना देण्याची योजना, स्रोतातून कर कपात योजनेच्या मयदित वाढ, व्यक्तिगत आयकर मर्यादा वाढवली, नवीन करप्रणालीत बदल हे स्वागतार्ह निर्णय आहेत. कोकणासाठी उपयुक्त योजना पुढीलप्रमाणे

राज्यसरकारच्या सहकायनि राबवायच्या प्रधानमंत्री धनधान्य योजनेच्या कमी उत्पादन असणाऱ्या एकूण १०० जिल्ह्यात महाराष्ट्रातील रत्नागिरीचा समावेश करून घ्यावा लागेल, फळ उद्योग आणि मत्स्य उद्योगासाठीच्या निर्यातप्रधान योजना रत्नागिरी- सिंधुदुर्ग या जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणे जरुरीचे आहे.

भारतीय संस्कृती दर्शवणारी खेळणी बनवण्याची योजना सावंतवाडी येथील लाकडी खेळणी उद्योगाला प्रोत्साहनदेईल. जहाज बांधणी क्षेत्राचा फायदा पालघरला होईल, कोकणात धार्मिक पर्यटन आणि होम स्टे योजने अंतर्गत रोजगारनिर्मिती होऊन उत्पन्न वाढेल.

error: Content is protected !!