प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियन डिएनई १३६ शाखा कणकवलीचे पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना दिले निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डिएनई १३६ शाखा कणकवलीच्या वतीने आज कणकवली पंचायत समिती कार्यालयासमोर २ तास धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांसाठी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हापरिषद मधील सर्व सुवर्गातील कर्मचाऱ्यांची हजारो रिक्त पदांची भरती करण्यात यावी, वाहनचालक पदभरती सुरु करावी, सर्व सुवर्गातील सेवा प्रवेश, भरती सुधारित नियमांची अधिसूचना प्रसारित करण्यात यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे पुनर्जीवित करणे व आश्वासित प्रगती योजने द्वारा वरिष्ठ वेतन श्रेणी अन्याय दूर करणे, सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी व्यापक स्वास्थ विमायोजना लागू करावी, ग्रामविकास विभागाकडे कर्मचारी महासंघाने सादर केलेल्या ३४ मागण्यांबाबत तात्काळ विचार व्हावा, आयपीसी कलाम ३५३ मध्ये सुधारणा करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, खाजगी करणाला मज्जाव करावा, विना अनुदान औषदान अनुदान प्रकरणी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनिअनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम, राज्य कॉन्सिलर देवेंद्र नलावडे, कणकवली तालुकाध्यक्ष वैभव धुमाळे, कणकवली तालुका सचिव वैभव ठाकूर, तालुका उपाध्यक्ष शशिकांत तांबे, महिला तालुका उपाध्यक्ष अर्चना लाड आदींसह सहाय्यक गटविकास अधिकारी वालावलकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे आदी उपस्थित होते

error: Content is protected !!