फोंडाघाट पंचक्रोशीत दुर्गेश चे कौतुक
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाटच्या सुपुत्रांनी चालू वर्षी आपापल्या विविध अभ्यास शाखा मध्ये दैदीप्यमान यश संपादन करून गावचे नाव देशपातळीवर झळकविले आहे. त्याच शृंखलेतील फोंडाघाटचा सुपुत्र आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील, दुर्गेश परेश बिडये याने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतली जाणारी युजीसी-नेट (UGC -NET) परीक्षा यशस्विरित्या उत्तीर्ण केली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने सोशल मेडिसिन आणि कम्युनिटी हेल्थ (Social Medicine and Community Health) या विषयावर लक्ष केंद्रित करून, ही परीक्षा दिली होती. युजीसी-नेट (UGC -NET) परीक्षा ही शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः वैज्ञानिक विभागात अतिशय कठीण व विशेष दर्जाची मानली जाते, लहानपणापासूनच अभ्यासाची ओढ असल्याने त्यांने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या तो जे. एस. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, मैसूर, कर्नाटक -५७००१५, भारत याठिकाणी फार्मास्युटिकल सायन्सेस (Pharmaceutical Sciences) या विषयात पी. एच. डी. (Ph.D.) करत आहे. कुमार दुर्गेश याने या यशाचे श्रेय त्याचे प्रेरणा स्थान असणारे त्याचे आजोबा स्व. शांताराम केशव बिडये (आबा बिडये), तसेच त्याचे आई-वडील परेश शांताराम बिडये आणि प्रणिता परेश बिडये तसेच त्याच्या सर्व गुरुजनांना प्रदान केले आहे. दुर्गेश हे सर्वत्र अभिनंदन होत आहे.












