खारेपाटण (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खारेपाटण हायस्कूल येथे नुकताच महिला दीन उस्तहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील कर्तृत्ववान व कर्तबगार महिलांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रारंभी महिला दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप उपस्थित होते. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, डॉ. मालडकर, महिला बचत गटाच्या पोटले मॅडम,अस्था पाटणकर, उद्योजिका तृप्ती पाटील, देवस्थळी मॅडम, प्रणाली बाणे ( C.H.O. नडगिवे), शर्मिन काझी, तिथवली इत्यादी महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कोकाटे यांनी केले व आभार आशा भोर यांनी मानले.















