चिवला बिचवर पर्यटकांनी केली सुरमई मासळीची चाेरी

मालवण (प्रतिनिधी) : शहरातील चिवला बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर इचलकरंजी येथील चार तरुणांच्या पर्यटन ग्रुपने भल्या पहाटे चिवला बीच येथील मच्छिमारांचे मासे चोरले दरम्यान मच्छिमारांना याबाबत माहिती मिळताच पर्यटक राहत असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन खात्री केली असता त्यांना चोरी झालेले मासे सापडून आले पर्यटकांनी माफी मागण्यास सुरवात केली मात्र चोरी करणाऱ्या त्या पर्यटकांना स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. त्या नंतर त्या पर्यटकांनी माफी मागत मासळीची किमत मच्छिमारांना दिली. रात्री मच्छिमारांनी समुद्रातून पकडून आणलेले मासे नेहमीप्रमाणे किनाऱ्यावर असलेल्या मच्छिमारी कावनात बर्फात घालून सुरक्षित ठेवले होते. सुरमई वगैरे किमती मासे त्यात होते. या मासळीची चोरी झाल्याचे आज सकाळी मच्छिमारांच्या निदर्शनास आले. पर जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपने ही मासळी चोरल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी ते पर्यटक राहत असलेल्या ठिकाणी धडक देत पाहणी केली असता त्यांना तेथे मासळी सापडून आली मासळीची चोरी केल्याने स्थानिकांनी त्या पर्यटकांना चांगला चोप दिला

error: Content is protected !!