बोर्डवे वाणीवाडी स्ट्रीट लाईट चे काम सुरू
कणकवली (प्रतिनिधी) : बोर्डवे गावातील कळसुली मुख्य रस्ता ते वाणीवाडी पेंढरी वाडी रस्ता स्ट्रीट लाईट चे काम व्हावे ही स्थानिक जनतेची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी पूर्ण केली आहे. या साठी आवश्यक निधी पालकमंत्री राणे यांनी उपलब्ध करून दिला. सदर कामाचा शुभारंभ भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच वेदिका पाताडे, उप सरपंच महावीर साळवी,आनंद शिंदे,गजानन शिंदे, राजू मोडक, मारुती घाडी,असिफ शेख,अक्षय शिंदे,श्यामसुंदर मोडक, प्रकाश पेडणेकर,श्रद्धा अपराध ,महेश एकावडे उपस्थित होते.












