आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील आचरा मालवण मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर चिंदर सडेवाडी येथील स्ट्रीट लाइट कामाचा शुभारंभ सिताराम उर्फ देवेंद्र हडकर (शक्ती केंद्र प्रमूख) चेअरमन श्री रामेश्वर वि.का.स सेवा सोसायटी चिंदर यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला.
यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजप ओ.बी. सी सेल जिल्हा सचिव प्रकाश मेस्त्री, उपसरपंच दिपक सुर्वे, मनोज हडकर, दत्ता वराडकर, संजय लोके, गणपत चिंदरकर, प्रफुल्ल फाटक, प्रकाश चिंदरकर, दिगंबर हडकर, निलेश हडकर, सडेवाडी पोलिस पाटील हर्षद बेनाडे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक वर्षे स्ट्रीट लाईटच्या प्रतीक्षेत असलेल्या सडेवाडी ग्रामस्थ कडून कामाला सुरुवात होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.












