नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे

जिल्हास्तरीय खुल्या तायक्कांदो स्पर्धेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : तायक्कांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्कांदो स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी किलो गटात २ सुवर्ण पदक,४ रौप्य पदक आणि ४ कांस्य पदक मिळवत एकूण १० पदके मिळविली आहेत.या यशाबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

सदर स्पर्धा कणकवली येथील नगरपंचायत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती. या स्पर्धेत खालील विद्यार्थांनी पदके मिळवली. मुलगे ३७ किलो वजन गट – चिन्मय गुरव (सुवर्ण पदक), सबजुनिअर २७ किलो वजन गट – हर्षण अडुळकर (सुवर्ण पदक), ३२ किलो वजन गट – आराध्य सावंत (रौप्य पदक), २९ किलो वजन गट- रेयांश सावकार (रौप्य पदक), २३ किलो वजन गट – साई गुरव (रौप्य पदक), ३८किलो वजन गट – अर्णव राणे (रौप्य पदक) २९ किलो वजन गट – अयान काझी (कास्य पदक), २७ किलो वजन गट – वेद कदम (कास्य पदक),३२किलो वजन गट – अफान काझी (रौप्य पदक) तसेच मुली २२ किलो वजन गट – आमना गिरकर हिने कास्य पदक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक व तायक्कांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे,अ मोल चौगुले, सयोग राजपकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडवेगिचे अध्यक्ष मनोज गुळेकर,कार्याध्यक्ष – रघुवीर राणे,सेक्रेटरी – मोहन कावळे, सह सचिव – राजेंद्र ब्रम्हदंडे, खजिनदार – परवेज पटेल, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक निलम डांगे, ओंकार गाडगीळ, तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!