कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने अनोखा उपक्रम

गावातील सर्व शाळांमध्ये बसविण्यात आले सी सी टी व्ही कॅमेरे

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच मुलांच्या शैशणिक उन्नतीसाठी नुकतेच सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने व पालकांच्या वतीने ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या गाव विकास आरखड्यात तरतूद करून १५ वित्त आयोग निधीतून हा खर्च करण्यात आला असून गावचे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थित या अनोख्या सी सी टी व्ही कॅमेरा यंत्रणेचा प्रत्यक्ष शुभारंभ गावातील शाळांमध्ये करण्यात आला. यावेळी उपसरपंच बबलू पवार,ग्रामपंचायत सदस्य बाबल्या गोसावी,अक्षता सदिकले,स्नेहा गोसावी,सारिका कुडाळकर,विशाखा राऊत,रवींद्र पवार ग्रामसेवक गिरीश धुमाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!