कणकवली (प्रतिनिधी) : कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कलमठ संदीप मेस्त्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दिवंगत शिक्षकांना व शाळा उभारणीत योगदान देणाऱ्या ग्रामस्थ यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर केक कापणे, निवृत्त माझी शिक्षकांचा सत्कार, शाळा उभारणीत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, त्याचप्रमाणे या शाळेतून काम करून गेलेले कार्यरत ‘शिक्षकांचा सत्कार’ पाककले स्पर्धेतील विजेतांना सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे विलास गुडेकर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत बुचडे यांनी केले. निवृत्त शिक्षक नारायण उर्फ नाना देसाई, लक्ष्मण प्रभू गुरुजी, विलासनी ढेकणे, रश्मी मालंडकर माजी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केली यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा, तसेच सुश्राव्य भजने आणि आजी माजी विद्यार्थी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कलमठ ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य- नजराना शेख, श्रेगस चिंदरकर, इफ्फत शेख, नितीन पतार, सुप्रिया मिस्त्री, हेलन कांबळे, विनिता बुचडे, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, शिक्षण विस्तार अधिकारी बीट कणकवली प्रेरणा प्रदीप मांजरेकर, केंद्रप्रमुख काळू मंगळू पवार शाळा शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ वर्देकर, शाळा शतक महोत्सव निधी संकलन व आर्थिक लेखा समिती अध्यक्ष विलास रघुनाथ बुचडे, सचिव उत्तम विजय चिंदरकर, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष तिलास हरी गुडेकर, किशोर उर्फ रामचंद्र नारकर, शाळा व्यवस्थापन समिती शाळा कलमठ कुंभारवाडी अध्यक्ष गौरी पावसकर उपाध्यक्ष नेहा वावळीये, स्नेहल नरेंद्र चिंदरकर, अक्षरा अमित कदम, स्नेहल संतोष देसाई, मधुरा मंजुनाथ कुंभार, वैशाली विवेकानंद चिंदरकर, अक्षता आशिष चिंदरकर, त्याचप्रमाणे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अमित हर्णे, चित्राक्षी देसाई, ऋतूजा जाधव, शाळा शतक महोत्सत समिति, शाळा सुधार समिति, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ अध्यक्ष आणि सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवेदक राजेश कदम आणि रमेश डोईफोडे यांनी केले










