श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचे मराठी राजभाषा दिना निमित्त आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा येथे गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय खुली वाचक स्पर्धा आयोजित केलेली असून सदर स्पर्धेसाठी स्पर्धकाने प्रसिद्ध लेखक कै. जयवंत दळवी यांच्या कोणत्याही पुस्तकावर कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १० मिनिटे परीक्षणात्मक बोलायचे आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून प्रथम येणाऱ्या १० स्पर्धकांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे.
सदर स्पर्धेसाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक -रु. १५००/- व चषक, द्वितीय क्रमांक – रु.१२००/- व चषक, तृतीय क्रमांक – रु. १०००/- व चषक, उत्तेजनार्थ १-रु. ५००/-, उत्तेजनार्थ २-रु. ५००/- ठेवण्यात आली आहे.
नावनोंदणीची संपर्क क्रमांक ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी- ९४२१२६३३४६ व ०२३६५-२४६०१७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्यावतीने करण्यात आले आहे.












