कणकवली (प्रतिनिधी) : शिमगोत्सवानिमित्त श्री देव काशीकलेश्वर मांड उत्सव समितीच्यावतीने शनिवार २२ मार्च रोजी रात्री ९.३० वा. कलमठ बाजारपेठ येथील मांडावर हास्यकल्लोळ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे ५,५५५ रु., ३,३३३ रु., २,२२२ रु. व चषक अशी बक्षीसे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी संघांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी संदीप मेस्त्री (९४२००८८८८०), सचिन पेडणेकर, तनोज कळसुलकर यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कलमठमध्ये २२ मार्च रोजी हास्यकल्लोळ स्पर्धा
