कर्जदाराला कोणतीही माहिती न देता परस्पर पैसै काढल्याने 21 जणांविरोधात गुन्हा दाखल

15 जणांचा अटकपुर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला

ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील एका नागरी बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी कर्जदाराला कोणतीही माहिती न देता २३ लाख ५० हजार रुपये निलेश कडव यांच्या नावाने परस्पर काढल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात २१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील १५ जणांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी फेटाळला आहे.सावंतवाडी येथील एका नागरी बँकेच्या संचालक व कर्मचारी अशा १५ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी फेटाळला. या बँकेच्या २१ जणांविरुद्ध सावंतवाडी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे २३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज निलेश सखाराम कडव यांच्या नावाने परस्पर काढल्याचे हे प्रकरण आहे.सावंतवाडी ज्युस्तीन नगर येथील निलेश सखाराम कडव यांनी २७ नोव्हेंबर २०१२ ते ५ एप्रिल २०१६ या कालावधीत नागरी बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी मिळून २३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज आपल्या नांवे परस्पर उचल केले. हे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला, वृत्तपत्रांत जाहिरात दिली. त्यामुळे निलेश कडव यांनी सावंतवाडी न्यायालयात जाऊन दाद मागितली असता न्यायालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.सावंतवाडी पोलीस ठाण्यात २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी १५ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला तर या प्रकरणी चौकशी करण्यात बाधा येईल अशी मागणी केली.सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी बाजू मांडली.या प्रकरणी २१ जणांचा समावेश असलातरी १५ जणांचा २ ते १० आणि १६ ते २१ यांचा अटक पूर्व जामीन फेटाळला आहे, अशी माहिती सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी दिली.

error: Content is protected !!