संपत देसाई, वैभव नाईक यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर
कामकाज स्थगित करण्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे अदानी कंपनीला पत्र
कुडाळ (प्रतिनिधी) : विज ग्राहक संघर्ष समिती महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस व इतर समाजसेवी संघटना यांच्या वतीने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात आज कुडाळात विराट धडक मोर्चा काढण्यात आला. विज ग्राहक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथील महात्मा गांधी चौक येथून महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये हा धडक मोर्चा नेण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. विराट मोर्चाची दखल घेऊन महावितरण सिंधुदुर्ग मंडलचे अधीक्षक अभियंता यांनी अदानी एनर्जी सोल्युशन अहमदाबाद कंपनीशी पत्रव्यवहार करत कुडाळ व कणकवली विभागांतर्गत सुरू असलेले स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याचे कामकाज पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची प्रत आंदोलन कर्त्यांना देण्यात आली त्यानंतर हा धडक मोर्चा मागे घेण्यात आला.
स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधातील मोर्चाला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला होता. स्मार्ट प्रीपेड मीटर सक्तीचा जाहीर निषेध, चलेजाव, चलेजाव अदानी चले जाव. अदानी तुपाशी, जनता उपाशी. स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द झालेच पाहिजेत. महायुती सरकारचा अदानी वारसदार. महावितरणचे खाजगीकरण करणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध. स्मार्ट प्रीपेड मीटर हटवा महाराष्ट्र वाचवा. महायुती सरकारकडून जनतेची लूट अदानीला सूट, निवडणुकीत वापरला अदानीचा पैसा महायुती सरकारची जनतेकडून वसुली असे पोस्टर मोर्चात झळकवत महायुती सरकार आणि अदानी कंपनी विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सुनील शिंत्रे, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, संघर्ष समितीचे अतुल बंगे, अंकुश कदम, दीपक जाधव, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, अभय शिरसाट, राजन नाईक, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, बाळू मेस्त्री, अनुप नाईक, कृष्णा धुरी, सचिन कदम, योगेश धुरी, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, किरण शिंदे, उदय मांजरेकर, आफ्रिन करोल, अक्षता खटावकर श्रेया गवंडे, सई काळप, ज्योती जळवी, अनंत पिळणकर, वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी,अवधूत मालणकर, विजय प्रभू, विद्याप्रसाद बांदेकर, गंगाराम सडवेलकर, दीपक आंगणे,नरेंद्र राणे, संदीप सावंत, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, कन्याश्री मेस्त्री, पाटील, प्रकाश मोरुस्कर, रफिक मेमन, मंगेश बांदेकर, रुपेश खडपकर, अरुण परूळेकर, दिलीप परूळेकर, संजय परब, मदन वेंगुर्लेकर, राहुल कदम, के. एम शेख आदिंसह संघर्ष समितीचे सदस्य व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.